‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, – फडणविसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole
Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole

Devendra Fadnavis ; “जितेंद्र आव्हाड(Jitendra Avhad) यांचे वक्तव्य मुर्खपणाचे होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे(Bahujans), अभिजनांचे(Abhijans), आदिवासींचे(Tribals), दलितांचे (Dalits)अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी (Veg) होते की मांसाहारी (Non Veg), या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा आहे, अशा लोकांच्या भावनाना दुखावण्याचे काम विनाकारण केले जात आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचे म्हणत होते, त्यांनी साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddahv Thackeray) यांना लागवला आहे.(Jitendra Avhad’s statement was stupid)

अधिक वाचा  मोहन भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली- शरद पवार

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) यांनी श्रीराम मांसाहारी होते असे वक्तव्य केले होते. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सर्व बहुजन असून ते सर्व शाकाहारी आहेत, या सर्वांचा यातून अपमान नाही का झाला? विनाकारण विवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. तसेच जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचे म्हणत होते, त्यांनी साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विनाकारण स्वतःला शहीद घोषित करू नये

रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विनाकारण स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्या कंपनीवर छापा पडला अशी माहिती मिळत आहे, त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. त्यांनी काही केले नसेल, तर काही होणारही नाही. विनाकारण घाबरण्याची गरज नाही.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love