gtag('js', new Date());
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

Spread the love

Ajit Pawar: आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका  अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या  चिखलात लोटले असून, शहरात सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. शहराच्या जडणघडणीत आपण कधीही सत्तेचा उतमात होऊ दिला नाही, मात्र आता केवळ भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याटीकाही  त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या  बोट ठेवत सांगितले की, २०१५-१६ मध्ये महापालिकेकडे ४,८४४ कोटी रुपयांच्या ठेवी  होत्या, त्या आता अवघ्या २,००० कोटींवर आल्या आहेत. तब्बल ८,००० कोटी रुपयांच्या ठेवी मोडून शहराला कर्जबाजारी  करण्यात आले असून, एवढा पैसा खर्च होऊनही शहरात ठोस कामे दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकट्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा (Water Supply) विभागाचे दायित्व  ४,००० कोटींच्या पुढे गेले असून अनावश्यक कामे रिंग  करून काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिक वाचा  हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं -चंद्रकांत पाटील

शहरातील भ्रष्टाचाराचे उदाहरण देताना पवारांनी ‘ई-क्लासरूम ‘ (E-Classroom) आणि ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) प्रकल्पांचा उल्लेख केला. एका टीव्हीची मंजूर किंमत १.५ लाख रुपये असताना बाजारभाव  केवळ ५५,००० रुपये आहे, म्हणजेच प्रत्येक टीव्हीमागे मोठी लूट झाली आहे. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत केबल (Cable) टाकताना निविदेनुसार ५ फूट खोदणे बंधनकारक असताना केवळ गुढघ्यापर्यंत खोदाई करून कोट्यवधी रुपये लाटले गेले. विशेष म्हणजे, बिलांमधील बनवेगिरी लपवण्यासाठी चक्क लावून आकडे बदलल्याचे पुरावे पवारांनी यावेळी सादर केले.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर (Crime) आणि ‘खोदाई माफिया’वर  ही त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. लँड  आणि वाळू माफियांप्रमाणेच (Sand Mafia) आता शहरात खोदाई माफिया सक्रिय झाले असून, परवानगीविना रस्ते उखडून जनतेच्या कराचा (Tax) पैसा वाया घालवला जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली ७१ लाख रुपये लाटले गेले, तरीही शहरात २० हजार लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत, यावरून या भ्रष्टाचाराची व्याप्ती लक्षात येते, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  #Rohit Pawar: अजितदादांच्या अवतीभवती मलिदा  गँग - रोहित पवार

धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरूनही पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आळंदी माऊलीच्या  परिसरात कत्तलखाना  प्रस्तावित करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यामागील जागेवर पोलीस स्टेशनचे आरक्षण (Reservation) टाकणे हे केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी नमूद केले. शहराचे व्हिजन (Vision) हरवले असून रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो कुटुंबे उध्वस्त केली जात आहेत आणि बिल्डरांच्या (Builders) जमिनी मोकळ्या केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ‘घड्याळ’ (Clock )आणि ‘तुतारी’ (Trumpet ) या युतीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. “मी जे बोलतो ते करतो,” असे सांगत त्यांनी सत्तेत आल्यास शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आणि शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन दिले. ही निवडणूक भ्रष्टाचारी राक्षसाचे दहन करण्यासाठी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी कोणाही दबावाला  बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the loveसुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

पुणे: अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून १३ ‘बोगस’ शाळांची यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

by News24Pune time to read: <1 min
0