अजित पवारांना कोरोनाची लागण?काय म्हणाले पार्थ पवार?


पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व दौरे रद्द केले असून मुंबईच्या घरी ते विश्रांती घेत आहेत. थोडी कणकण आणि ताप आल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची कोरोन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले खरे मात्र या वृत्ताचे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडन केले आहे. त्यांनी वडील अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार कोरोनाच्या संपूर्ण काळात स्वत: खूप काळजी घेतात. दौरे, बैठका करतानाही ते किती काळजी घेतात याचा अनुभव कार्यकर्ते, अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आला आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या प्रतिनिधींबरोबर बोलताना नेहेमी अंतर ठेऊन बोला, त्यांच्या बूमवर सॅनिटायझर मारून बोलण्याचा प्रसंगही चांगलाच चर्चिला गेला आहे. तर, माहिती देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला लांबून बोल असा दम दिल्याचा प्रसंगही चांगलाच मिडीयामध्ये गाजला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि त्या प्रसंगांची पुन्हा चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, पार्थ पवारांनी अजित पवार यांना कोरोना न झाल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास शरद क्रीडा-सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पाठींबा