पुणे जिल्ह्यात बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 92.35 टक्के


पुणे-पुणेविभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90  हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 29  हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.15  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 16 हजार 776  रुग्णांपैकी 2 लाख 92 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 16 हजार 785 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7  हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.35  टक्के आहे.

सातारा जिल्हा

 सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44  हजार 136 रुग्णांपैकी 37 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 985 आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 458  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  सामाजिक भान जपत ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीचा स्त्युत्य उपक्रम

सोलापूर जिल्हा

 सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 573 रुग्णांपैकी 33 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 777 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

 सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 43  हजार 427 रुग्णांपैकी  39 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 379 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

 कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 569  रुग्णांपैकी 43 हजार 982 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 973  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 713 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 20, सातारा जिल्ह्यात 271, सोलापूर जिल्ह्यात 140, सांगली जिल्ह्यात 191  तर कोल्हापूर जिल्ह्यात 91 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

अधिक वाचा  पुणेकरांसाठी खुशखबर: आता मिळवा ५०० रुपयात एमएनजीएलचे गॅॅस कनेक्शन

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 615 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 717 ,सातारा जिल्हयामध्ये 288, सोलापूर जिल्हयामध्ये 296, सांगली जिल्हयामध्ये 244 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 70 अशा रुग्णांचा समावेश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love