तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)— कोरोर्नाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधव भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(aJIT PAWAR ) यांनी जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, त्यांची बदली कुठे करायची हे मला चांगले माहिती आहे असा सज्जड दम अधिकार्यांना दिला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(CHANDRAKANT PATIL) यांनी अजित पवार यांना टोला लगावत मैत्रीचा सल्लाही दिला आहे. What Chandrakant Patil said on Ajit Pawar’s statement

आरडा-ओरडा करून धाक दाखवून काही माणसे (अधिकारी) कामाला लागत नाहीत. प्रेमाने अडचणी समजावून घेऊन काम करून घ्यावे लागते असा टोला लगावतानाच प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते तशी अजित पवार यांची आहे. याच कार्यपद्धतीने काम सुरू ठेवण्यासाठी अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असायला पाहिजे असा मैत्रीचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.  

चंद्रकांत पाटील म्हणाले, मित्र या नात्याने अजित पवार यांना म्हणत असतो की, आरडा-ओरडा करून धाक दाखवून काही माणसे (अधिकारी) कामाला लागत नाहीत. प्रेमाने अडचणी समजावून घेऊन काम करून घ्यावे लागते. पण, प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते तशी अजित पवार यांची आहे. याच कार्यपद्धतीने काम सुरू ठेवण्यासाठी अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असायला पाहिजे. सकाळी 7 ते 1 मुंबईत काम करायचे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुण्या काम करायचे अन रात्री दहा वाजता पुन्हा मुंबईला निघायचे, असे करायला हवे. तुमचा धाक आठवड्यातून एकदा येऊन राहणार नाही. रोज येऊन बसायला लागेल, असे पाटील म्हणाले आहेत. नेमके पुण्यातील अधिकाऱ्यांना अजित पवार काय म्हणाले होते?

शिवसेनेचा हम करेसो कायदा

शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. हे ‘हम करे सो कायदा’, असा प्रकार आहे. राज्यात शिवसेनेची दादागिरी सुरू आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात कोणी आवाज काढायचा नाही. मग, तो पत्रकार असो, नागरिक असो की, माजी नौदल अधिकारी. केवळ यांची स्तुती करा, असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला.  

राज्यात शिवसेनेची दादागिरीचे राज्य सुरु आहे. सरकारच्या विरोधात पत्रकारांनी, नागरिकांनी, निवृत्त सैनिकांनी आवाज काढायचा नाही, फक्त यांची स्तुती करा. अशी स्तुती तुमच्या भोवती असणारे लोक करतीलच की नागरिकांनी कशाला करायची? जर नागरिकांनीही आपली स्तुती करावी असे वाटत असेल तर त्यासाठी काम करा, असा सल्ला पाटील यांनी सरकारला दिला.

सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकारने 45 दिवस गुन्हा दाखल करून घेतला नाही. सीबीआयच्या तपासाला विरोध केला. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नव्हते. उलट राज्य शासनाने म्हटले पाहिजे की लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध लावा. मात्र, त्यांनी सीबीआय चौकशीला टोकाचा विरोध केला. यामुळे ‘दाल में कुछ काला है!’ अशी चर्चा तर नक्कीच रंगणार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं

काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण (MARATAHA ARAKSHAN) कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे देशात आणि राज्यात त्यांचं सरकार होत. मग मराठा समाजला आरक्षण का दिलं नाही? आताही सर्वोच्च न्यायालयात केस व्यवस्थित चालवली नाही. मोठमोठे वकील देऊन काही होत नाही. उच्च न्यायालयात ९० दिवस केस चालली, ९० दिवस संध्याकाळी तीनतास प्रतिकोर्ट भरवायचो. काय चुकलं, उद्या काय मांडायचं अशी आम्ही ९० दिवस तयारी केली. मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेच्या अगोदर कोणी मंत्री गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली नाही. वकीलही दिशाहीन होते. तर, मराठा मागास कसा? हे मागास आयोगाने सत्तावीसशे पाणी रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. हे दाखवलं असत तरी सर्वोच्च न्यायालय राजी झालं असतं असं देखील पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *