महाविकास आघाडीची वज्रमुठ ढिली : अजित दादांनी केला पुणे लोकसभेच्या जागेवर दावा

Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004
Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004

पुणे— पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची (pune loksabha) पोटनिवडणूक (By-elections) लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. सांगितले.दरम्यान, ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला. ज्या पक्षाची ताकद जास्त त्यालाच ही जागा मिळावी, असेही पवार ते म्हणाले. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडीतील (mahavikas aghadi) सुंदोपसुंदी समोर आली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्याबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असल्याने पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटत होते. पण बहुतेक गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी माहिती आहे. आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. खासगीमध्ये रवींद्र धंगेकरांनापण विचारा. त्यांना निवडून आणण्याकरिता सगळ्या आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केले.

अधिक वाचा  डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे या कारणावरून कापले चाकूने केस

निवडणूक लागेल तिथे मित्र पक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद पाहण्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांची माहिती घ्यायची. साधारण कोणाला किती मते पडली, अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. काँग्रेसने आपणच ही जागा लढणार असल्याचा दावा केला, यावर अजित पवार यांना विचारले असता, तो त्यांचा अधिकार आहे, आमच्या मित्र पक्षाला माझ्या शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यातील पुण्यातील पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने कर्नाटकातून ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणले आहे. तसेच निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील स्थितीविषयी रिपार्ट मागितला आहे.

अधिक वाचा  १० वेळा देशाची सत्ता बहाल केलेल्या जनतेप्रती उत्तरदायी पक्षावर’ गंज कसा चढु शकतो..? काँग्रेसचा सवाल

दरम्यान, एकीकडे राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार देतानाच अजित पवारांनी सध्या नेतेमंडळींकडून देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. “सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्यव्य करतात. याचा खरंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.

राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर सूचक विधान केलं. “राजू शेट्टी म्हणाले मी स्वतंत्र उभा राहणार, ६ लोक उभे करेन. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतंय. सगळ्यांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या. निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच हे सगळं स्पष्ट होईल”, असं अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love