स्वराज्य संघटना २०२४ च्या निवडणुक मैदानात उतरणार : पहिल्या अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे– राज्याच्या राजकारणाची पातळी (politics level ) सध्या अत्यंत खालावली असून, खोके-बोके, कुत्रा -मांजर अशा टिप्पण्या, चर्चांभोवतीच ते फिरत असल्याचे दिसत आहे. यातून बाहेर काढत सुसंस्कृत महाराष्ट्र (Cultured Maharashtra) घडविण्यासाठी स्वराज्य संघटना (swarajya sanghtna) आगामी २०२४ च्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhajiraje) यांनी शनिवारी पुण्यात संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केले. समविचारी पक्षांसोबत युती करण्याबरोबरच गरीब मराठा समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यासह अन्य ठराव संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात (Statewide convention) या वेळी मंजूर करण्यात आले.

पुण्यातील शिवाजीनगर येथे साकारण्यात आलेल्या ‘स्वराज्य संघटने’च्या राज्य मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मराठा समाज बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले. त्यानंतर येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. त्या वेळी मार्गदर्शन करताना संभाजीराजे बोलत होते. संघटनेचे सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव, (धनंजय जाधव) उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील,(raghunath chitre patil) संपर्कप्रमुख करण गायकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, मागच्या वषी मी स्वराज्य संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानंतर आठ महिन्यात संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आई तुळजाभवानीच्या गाभाऱयात म्हणजेच तुळजापुरात पहिली शाखा स्थापन करीत आपण काम सुरू केले आहे. आता गाव तेथे शाखा; घरोघर स्वराज्य, हा आपला संकल्प आहे. तो तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील वातावरण आज अत्यंत निराशाजनक आहे. राजकारणाचा स्तर पुरता ढासळला आहे. कुणीही विकासावर किंवा लोकांच्या प्रश्नांवर बोलताना दिसत नाही. राजकीय पक्ष केवळ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेतात. त्यांचे विचार घेत नाहीत. खोटे ते रेटून बोलले जात आहे. खोके-बोके, कुत्रा-मांजर, याभोवतीच राज्याचे राजकारण फिरताना दिसते. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का? राज्यातील राजकारणी माजले आहेत, उन्मत्त झाले आहेत. अशा प्रस्थापितांना विरोध केलाच पाहिजे. 

 महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी, आमदार, खासदारांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आजवर काहीही केले नाही. सरकारने, लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी टाळता कामा नये. यापुढे महाराष्ट्रात हे चालणार नाही. आता सक्षम पर्याय देण्यासाठी स्वराज्य संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. आगामी 2024 च्या निवडणुका पक्ष लढविणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे. आपल्याकडे कुणी नेते नसतीलही. मात्र, सुसंस्कृत नेते नक्कीच स्वराज्य पक्षात प्रवेश करतील, असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला. आम्हाला ब्रीदवाक्मय वा बोधचिन्हाची गरज नाही. सामान्यांना, कष्टकऱयांना ताकद देणे, हाच आमचा ध्यास असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 दरम्यान, या अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले. विनोद साबळे यांनी भारतीय संविधानाचे समर्थन व संरक्षण करण्याचा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. याशिवाय शेतकऱयांना हमीभावासह आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता कटिबद्ध राहणे, शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, आरोग्य या पंचसूत्रीतील मुख्य घटकास व उपघटकास न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणे, स्वयंरोजगार व उद्योग क्षेत्रात स्थानिक भूमीपुत्रांना संधी आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, आजच्या निराशाजनक राजकारणात गुणात्मक बदल घडविण्यासाठी येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात स्वराज्यच्या माध्यमातून उतरण्याचा निर्धार, गरीब मराठा समाज आणि इतर वंचित समाजातील समूहांना उमेदवारीत प्राधान्य देणे, स्वतःहून कुणाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही. मात्र, ज्या समविचारी राजकीय पक्षांना आमच्यासोबत राजकीय युती करायची आहे, त्यांचे स्वागत असेल, अशा ठरावांचाही यात समावेश होता. 

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाला बगल 

 दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाला बगल दिली. याविषयावर ते काही बोलतील किंवा सरकारला चार गोष्टी सांगतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. अधिवेशनातील ठरावातही मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही ठराव नव्हता. संभाजीराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षणावर सातत्याने भूमिका मांडलेली असताना मुख्य कार्यक्रमात मात्र त्यांनी याविषयाला बगल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *