मस्करीत मोबाइल खिशातून काढल्याच्या रागातून तरुणाने केली डोके दगडाने ठेचून मित्राची हत्या

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे— मद्य पिताना खिशातून मस्करीत मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेत या घटनेत नारायण वसंत वाघमारे(वय ३२)  या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र अमर उर्फ एक्या गौतम कसबे या २४ वर्षाच्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन मित्र मद्य पार्टी करत बसले होते. नारायण वसंत वाघमारे आणि अमर गौतम कसबे असे दोघांची नावे आहेत. हे दोघे शुक्रवारी दुपारी दोन वाजता दरम्यान इंद्रायणी नगर भागातील यशवंत चौक या ठिकाणी मद्य पार्टी करत बसले होते. मद्य पार्टी करताना नारायण वाघमारे याने अमर गौतम कसबे याच्या खिशातील मोबाईल मस्करीत काढला. त्यामुळे संतापलेल्या अमर गौतम कसबे याने नारायण वसंत वाघमारे याच्या डोक्याला दगडाने ठेचून गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान नारायण वसंत वाघमारे यांचा एका खाजगी रुग्णालयात आज मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात