मोदी सरकारची वाटचाल सरदार वल्लभभाई पटेलांच्या संस्कार व शिकवणुकी विरोधी -गोपाळदादा तिवारी

राजकारण
Spread the love

पुणे- भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा चीनकडुन बनवून घेतलेला ऊंच पुतळा हा मोदी सरकारने गुजरात मध्ये बसवला खरा, परंतु वाटचाल मात्र पटेलांच्या संस्कार व शिकवणुकी विरोधी चालली आहे या विषयी खंत वाटते असे उद्गार काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने,  गुरुवारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या वतीने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी तिवारी बोलत होते.

ते पुढे म्हणाले देशाचे पहिले गृहमंत्री असलेले सरदार पटेल यांनी हिंदुत्ववादी असलेल्या रा.स्व. संघाची वाटचाल इतर धर्मियांविरोधी द्वेष पसरवणारी असल्याने संघावर बंदी आणण्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लेखी पत्राद्वारे सुचित केले होते. मात्र ते कशाहीचे प्रणेते असल्याने पं. नेहरू यांनी  अशा प्रकारे बंदी आणण्यास मनाई केली. हा सत्य इतिहास असतांना काँग्रेसने देशात टिकवलेल्या लोकशाहीच्या आधारे सत्तेत आलेल्या मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील सत्ताधीश मात्र भारताच्या सत्य व वास्तवतावादी इतिहासाचे विकृती करण करीत असल्याचा आरोप देखील तिवारी यांनी केला.  

या  प्रसंगी, प्रदेश महीला काँग्रेस मा. अध्यक्षा सौ कमलताई व्यवहारे, प्रदेश काँग्रेसचे ॲड अभय छाजेड, मनपा पक्षनेते आबा बागुल, मा महापौर रजनी त्रिभुवन, लता ताई राजगुरू, प्रदेश महीला काँग्रेस उपाध्यक्षा सौ संगिता तिवारी, सौ वैशाली मराठे, सौ सुजाता शेट्टी, अजित दरेकर, मेहबुब शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश पवार, यु काँ अध्यक्ष राहुल शिरसाठ, नरेंद्र व्यवहारे, मेहबुब नदाफ, मुख्तार शेख, द स पोळेकर, सतिन आडेकर, संदिप मोकाटे, भगवान कडु, भुषण रानभरे, शिलार रतनगिरी, सतिंश पवार, रमेश सोनकांबळे, सुजित यादव, रमेश सकट, ऋषीकेश बालगुडे, यशराज पारथी, सचिन भोसले, दिपक ओव्हाळ, इ. ब्लॅाक अध्यक्ष, युकाँ, एनएसयुआय, महिला काँग्रेस इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *