टीईटी परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेकडे मिळाले आणखी घबाड


पुणे–शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे अजूनही घबाड सापडत आहे. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयात ३३ लाख तर सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख असे मागील २ दिवसात ५८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने जप्त केली आहे. यामुळे आता आणखी किती लोकांकडे सुपे याने पैसे दिले होते आणि या प्रकरणात कोण कोण बडे अधिकारी आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर दीड किलो  सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.

अधिक वाचा  हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरप्रकार? : निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची रणवीर सिंग यांची मागणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेच्या घर आणि कार्यालयांमध्ये केलेल्या छापेमारीत ३३ लाख सापडले आहेत. काल सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख रुपये सापडले होते. तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर  दीड किला सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.

तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा यापूर्वी जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिक ऐवज जप्त करण्यात आला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love