पुणे— हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवून पाकिस्तानला (pakistan) गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून एटीएसकडून (ats) अटक करण्यात आलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) चे संचालक प्रदीप कुरुलकर (pradeep kurulkar) यांचे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर कुणी काम करत असेल तर त्याला माफी नाही हा चांगला संदेश सर्वत्र जायला हवा असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणीही त्यांनी केली.
पुण्यात आज विधानभवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कुरूलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली एटीएसकडून अटक करण्यात आली असून २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .प्रदीप कुरुलकर यांच्याबाबतीत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की प्रदीप कुरुलकर याने जो काम केलं आहे ते देशद्रोही काम केलं आहे. त्या बाबतचे सर्व पुरावे हे समोर आलेले आहत. ज्या वेळेला काही लोकांच्या अंगावर एखादी गोष्ट येते तेव्हा ते चिडीचूप बसलेले असतात. कुरूलकर यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना शासन झालं पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल केलाच पाहिजे.
यावेळी समीर वानखेडें प्रकरणाबाबत बोलताना पवार म्हणाले की, जेव्हा नवाब मलिक हे समीर वानखेडेंबाबत बोलत होते, तेव्हा त्यांच्या बाजूने अनेक लोक समोर येऊन बोलत होते. आत्ता जे नवाब मलिक बोलत होते तेच सीबीआय बोलत आहे.त्यांचं समर्थन करणारे आत्ता बॅकफूट वर गेले आहेत. आज जे सीबीआयच्या माध्यमातून घडत आहे ते आनंदाची गोष्ट आहे.त्यांनी पारदर्शकपणे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ लोकांच्या समोर आणावं असं यावेळी पवार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल विचारले ते म्हणाले की, ही सगळी अफवा आहे. लोकसभेबाबत चर्चा झाली पण जागेच्या वाटपाबाबत चर्चा झाली नाही.पुढील काळात एकत्र बसून मार्ग काढण्यात येईल.
गुरुवारी पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ट्यूशन लावली पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ते त्यांचे राजकीय अर्थाने भाषण होते. त्यांना जर खरंच ट्यून्शन लावायची असेल तर मी लावून देतो.
भाजपकडून महाविकास आघाडीचा पोपट मेला अशी टीका केली जात आहे. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कुठं पोपट मेला आहे ते दाखवा. उगाच त्यांनी म्हणायचं पोपट मेला. आम्ही म्हणायचं मैना मेली, मोर मेला काहीही मेलेल नाही. सगळ जनतेच्या समोर आहे अशी टिप्पणी त्यांनी केली.
पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे याबाबत अजित पवार यांनी, आत्ता आमचं काय खर नाही. आत्ता बारामती लोकसभा निवडणुकीत मला जिवाचं रान करावं लागणार असं म्हणत खिल्ली उडवली. तर टेकवडे यांना आमदार आम्हीच केलं.मी बँकेचं अध्यक्ष केलं.काही वेगळे प्रश्न आहे.पुरंदरला जेव्हा सभा होईल तेव्हा तिथं यावर सविस्तर बोलेल.अस यावेळी पवार म्हणाले.