शरद पवारांसाठी यूपीएच्या अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही- सुशीलकुमार शिंदे

राजकारण
Spread the love

पुणे-शरद पवारांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

पुण्यात एका कार्यक्रमात आले असता दिली पत्रकारांशी ते बोलत होते. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करावे अशी काही लोकांची इच्छा आहे, असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांना विचारला ते म्हणाले, यूपीए अध्यक्षपदाची जागाच रिकामी नाही, जागा रिकामी असती तर गोष्ट निराळी होती.

सध्याच्या राज्याच्या राजकारणात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि घसरत चालेल्या राजकारणाच्या स्तरावर सुशीलकुमार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही जो काळ अनुभवला आहे त्यात काही परंपरा, काही संकल्पना, काही संकेत पाळून सगळं बोलत होतो. आज मला वाटते ते कमी झाले आहे. आता तरी या सगळ्यामधून हे लोक सुधारतील अशी माझी अपेक्षा आहे”. असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या विधानाबाबत विचारले असता सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कोणीही जातीयतेचा प्रश्न घेऊन हाताळत असेल तर या देशाच्या दृष्टीने ते योग्य नाही. जाती-धर्माचे राजकारण या देशामध्ये चालत नाही, त्यामुळे या असल्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही” असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावला.

शरद पवार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळे असते, असे विधान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाबाबत विचारले असता, यशोमती ठाकूर यांनाच विचारा असे म्हणत शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केले. या विधानाचादेखील सुशीलकुमार शिंदेंनी समाचार घेतला आहे. दंगली आणि जातीचा काही संबंध नाही. एका जातीला दोष देण्याचा काही कारण नाही. ब्राह्मण, दलित, मराठा कोणीही असो सर्वांनी सर्वधर्मसमभावाची पूजा केली पाहिजे”, असे शिंदे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *