महागड्या मोटारी चोरून विकणाऱ्या टोळीने संशय न येण्यासाठी लढवली ही शक्कल : १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ मोटारी जप्त


पुणे–महागड्या मोटारी चोरून त्यांची विक्री करण्यासाठी संशय न येण्यासाठी शक्कल लढवणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथून महागड्या मोटारी चोरून पिंपरी – चिंचवड शहरात आणायच्या आणि त्या मोटारींवर पिंपरी, पुण्यातील अपघातग्रस्त मोटारींचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक असलेला भाग लावून या मोटारींची विक्री करणाऱ्या  दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना या गुन्ह्यात मोटारी विक्री करण्यासासठी मदत करणाऱ्या चिखली आणि खोपोलीतील दोन जणांनाही पोलीसांनी गजाआड केले आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे उपस्थित होते. मनजीत जोगिंदरसिंग मारवा (रा. चिंचवड. मूळ रा. नवी दिल्ली), दीपक चमनलाल खन्ना (वय ४०, रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मोटारी विक्रीसाठी मदत करणारे प्रतिक उर्पâ नागेश छगन देशमुख (वय २८, रा. खोपोली, जि. रायगड) आणि हारूक शरीफ शेख (वय ३९, रा. चिखली) या दोघांनाही गजाआड करण्यात आले आहे.

अधिक वाचा  अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

गुन्हे शाखेच्या पोलीसांनी २६ जानेवारी २०२० रोजी रावेत येथील एका गॅरेजवर छापा टाकून मोटारी, मोटारींचे सुटे भाग आणि अनेक इंजिन जप्त केले होते. पंजाब राज्यातील असणाऱ्या या मोटारींवर बनावट नंबर असल्याचे आढळून आले होते. पोलीसांनी या गुन्ह्यात चनप्रित हरविंदरपाल सिंह (रा. रावेत) याला अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील त्याचा साथीदार मनजित मारवा हा पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मारवा हा त्याच्या साथीदारासह दिल्ली येथून इनोव्हा आणि व्हेंटा या चोरीच्या मोटारी घेऊन मुंबई, पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोशी, खेड आणि सुपा या टोलनाक्यांवर सापळा रचला. मोशी टोलनाक्यावर आरोपींना पोलीसांचा सुगावा लागल्याने मोटारी वळवून ते नाशिकच्या दिशेने जाऊ लागले. मात्र, पोलीसांनी ३० किलोमीटर पाठलाग करून मारवा आणि खन्ना या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार इनोव्हा, फोच्र्यूनर, इर्टीगा, स्वीफ्ट, होंडा सिटी, टोयटा इटॉस, आल्टो, निसान टेरेनो, व्रेâटा, बोलेरो वॅâम्पर या प्रत्येकी एक मोटारी अशा १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ महागड्या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  विनामास्क फिरणाऱ्या आमदाराकडून केला ५०० रुपये दंड वसूल,कोण आहेत हे आमदार?

चॅसिस, इंजिन क्रमांकामुळे संशय नाही

आरोपी मारवा याने पसार असताना कोंढवा भागात नवीन गोदाम भाड्याने घेऊन त्यामध्ये गॅरेज चालू करण्याच्या प्रयत्नात होता. मारवा हा विमा कंपन्यांकडून पिंपरी-चिंचवड, पुणे  परिसरातील अपघातात नुकसान झालेल्या मोटारी कागदपत्रासह विकत घेत असे. त्यानंतर त्याच मॉडेलच्या आणि रंगाच्या मोटारी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथून आरोपी खन्ना हा चोरी करून मारवा याला आणून देत असे. त्या मोटारींवर अपघातग्रस्त मोटारींचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक असलेला भाग लावून या मोटारींची पुन्हा विक्री करत असे. त्यामुळे त्यांच्यावर संशय येत नसे. मारवा याच्यावर दिल्ली, हरियाणा येथे १२ गुन्हे आहेत. तर, खन्ना याच्यावरही तीन राज्यात ३८ गुन्हे दाखल आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love