लालकृष्ण अडवाणी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मृत्यूचा फतवा: या अतिरेक्याने दिली धमकी


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ‘जस्टिस फॉर शीख’ Justice for Sikhs या Khalistani दहशतवादी संघटनेने एक वादग्रस्त पोस्टर जारी केले असून या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूचा फतवा काढण्यात आला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबरोबरच सिख फॉर जस्टिसचे (एसएफजे) संचालक गुरपतवंत सिंह Gurpatwant Singh Pannu हा गेल्या दोन दिवसांपासून भारतीय मीडियाला पूर्व-रेकॉर्ड केलेले संदेश पाठवत आहे.  हे मेसेजेस अमेरिकेतून करण्यात येत असलेल्या फोनद्वारे ऐकवण्यात येत आहेत.   

या संदेशात त्याने पाच नोव्हेंबरला दिल्लीहून लंडनला जाणारे एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण थांबविण्यासाठी आपण काहीही करू शकतो अशी धमकी त्याने दिली आहे. मात्र, याबाबत देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांच्या उच्च उच्च अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार   आरोपी गुरपतवंत सिंग याला अशी विधाने करून मीडियामध्ये मथळे बनवायचे आहेत. यापूर्वीही अशी त्याने अशी विधाने केली आहेत. परंतु, सुरक्षा यंत्रणा त्यांच्या स्तरावर जागरूक असतात.

अधिक वाचा  मोठी बातमी: सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द; पंतप्रधानाच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वीच शीख फॉर जस्टिसचा  संचालक गुरपतवंतसिंग पन्नू यांना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. गुरपतवंत सिंह यांची बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत मालमत्ताही तपास यंत्रणेने जप्त केली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की गुरपतवंत सिंह हे भारताविरूद्ध दहशतवादी कारवाया करीत आहेत. शीख समाज तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी भडकावत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरपतवंत सिंह यांच्याबद्दल सांगितले होते की, पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग होता. विदेशातून तो दहशत व तोडफोड करणार्‍या कारवायांना प्रोत्साहन देत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love