हसन मुश्रीफ यांचे विधान राज्यपालांना बदनाम करण्यासाठी-चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे : महाविकास आघाडी सरकारकडून विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवल्या जाणाऱ्या 12 सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagatsingh koshyari बाजूला ठेवणार आहेत,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadanvis आणि राज्यपालांमध्ये झालेल्या चर्चेत ही ठरवण्यात आल्याचा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या सांत्वनसाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी  बोलताना हे वक्तव्य केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचे हे विधान अत्यंत हास्यास्पद असून, हा प्रकार केवळ राज्यपालांना बदनाम करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त Governor appointed आमदारांच्या 12 जागांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कोणाचे नाव या 12 जणांच्या यादीत आहेत, ही अद्याप गुलदस्त्यात आहे तर दररोज राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी कोणाला संधि मिळणार याबाबत अनेक नावांचीही चर्चा सुरू आहे. ही सुरू असतानाच राज्य सरकारकडून देण्या त येणार असलेल्या नावांबाबत राज्यपाल काय  भूमिका घेतात याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. हे सर्व सुरू असताना आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसण मुश्रीफ hasan mushrif यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला होता.  

आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या सांत्वनसाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलताना ही वक्तव्य केल्याचे मुश्रीफ म्हणाले. राज्यपालांचा  राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू आहे. संविधानाला न जुमानता  जाऊन राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला होता.

दरम्यान, विनय कोरेंच्या आईचे निधन झाल्याने, त्या ठिकाणी मी सात्त्वनासाठी गेलो होतो, अशा ठिकाणी मी राज्यपाल नियुक्त १२ जागांचा विषय कसा बोलेऩ असे पाटील यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *