यशवंत वेणू पुरस्कार अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर


पुणे -यशवंतराव स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे. बुधवार २५ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे देण्यात येणार आहे अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

रोख रुपये ५,००० मानपत्र पुणेरी पगडी शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते प्रशांत दामले, मराठी उद्योजक अमित गोखले तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पुणे महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांची विषेश उपस्थित असणार आहे.   

अधिक वाचा  महिनाभरात गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन केले जाणार - मुरलीधर मोहोळ

याच कार्यक्रमात पुण्यातील covid मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील माधुरी गायकवाड ( परिचारिका),सागर निकम ( सफाई कामगार),विलास अडागळे ( बिगारी ,वैकुंठ स्मशानभूमी) ,धनंजय पुरकर ( कलाकारांना मदत करणारे) यांचा खास covid योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.

नाट्य परिषदेचे समीर हंपी , प्रवीण बर्वे , सत्यजित धांडेकर , दीपक गुप्ते या समितीने एकमताने या पुरस्काराची निवड केली आहे . करोना च्या कालावधीनंतर २५ नोव्हेंबर पासून नाट्यगृह सुरु करून नाट्यव्यवसायाचा पुनःश्च हरी ओम करण्याकरीता शासनाच्या नियमांना धरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला नाट्य रसिकांनी उपस्थित राहून नाट्यकलेवर असलेले प्रेम व्यक्त करावे असे सुनील महाजन म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love