मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

Uncategorized
Spread the love

औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीपासून मतांची आघाडी राखत चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57 हजार 895 मतांनी पराभव केला.

चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मते पडली तर बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण 2 लाख 41 हजार 908 इतके झाले होते. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात भाजपचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली होती. त्यांना 6712 तर सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली.

भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून आपली सर्व शक्ति पणाला लावली होती परंतु सुरुवातील चुरशीची वाटणारी हे निवडणूक एकतर्फी झाली.  आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे हेही या निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी आणि भाजपचे बंडखोर आणि पांकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे रमेश पोकळे यांनी घेतलेली मते यामुळे चव्हाण यांचा विजय अधिक सोपा झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *