धक्कादायक: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी इथल्या नव्या इमारतीला ही आग लागली. सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले. दरम्यान, तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं होतं मात्र, अग्निशमन दलाचे जवान आग विझवत पाचव्या मजल्यावर गेले असताना त्यांना त्या ठिकाणी पाच मृतदेह होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील यासंबंधी माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आले आहे.

 दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत आहे.हिंदुस्थानमध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.त्यामुळे, कोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. 

आगीमागे घातपात?

दरम्यान,भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका व्यक्त केली आहे. 

“दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवाने कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, असं भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.

‘कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही’

जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

‘नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम?’

ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *