हा पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा सवाल : पंतप्रधान मोदी गप्प का?


मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निकटचे उद्योगपती गौतम अदानी( Gautam Adani) यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर परदेशात गेले आणि ते पुन्हा भारतात आले. त्या पैशातून अदानी यांचे विविध प्रकल्प उभे केले जात आहेत असा आरोप कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. हा पैसा कुणाचा आहे? (Whose money is this?) हा पैसा अदानींचा आहे की आणखी कुणाचा आहे? आणि दुसऱ्या कुणाचा असेल तर ते पैसा कुणाचा आहे याची चौकशी करावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गप्प का आहेत? (Why is PM Modi silent?) तसेच ईडी(ed), सीबीआय(cbi) हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदींनी खासदार संभाजीराजेंच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे हा शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान :छावा मराठा संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठक आज आणि उद्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज मुंबईत आले होते. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

च्यांग चुंग लिंग कोण?

राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत हल्लाबोल केला. गौतम आदानी यांचे बंधू  विनोद अदानी हे मास्टरमाइंड असून अदानी यांच्या कंपनीमध्ये नासार अली शाबान अहली आणि च्यांग चुंग लिंग ( Chang Chung Ling)या चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे. अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून भारतात विविध विकास प्रकल्प राबविले जात आहेत तर मग त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? ही चीनी व्यक्ति कोण? असा सवाल करत हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याची संयुक्त संसदीय समिती (जेपेसी) (jpc) मार्फत चौकशी करावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.

अधिक वाचा  मुरलीधर मोहळ यांनी केला भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प : बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्राचे प्रकाशन

सेबीकडून (sebi) अदानी यांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये सेबीने यांना ‘क्लीन चीट’ दिली. परंतु, ज्या व्यक्तीने या प्रकरणाचा तपास केला तीच व्यक्ति अदानी यांच्या मालकीच्या ‘एनडी टीव्ही’ मध्ये संचालक आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. गौतम आदानी यांची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी का केली जात नाही असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love