राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल


पुणे–विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar sawarkar) यांचे नातू सत्यकी सावरकर कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीची फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी खोटे आरोप करून सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्यकी यांनी केला आहे.

सत्यकी सावरकर  हे वीर सावरकर (veer sawarkar ) यांच्या भावाचे नातू आहते. त्यांनी ट्विट करून राहुल गांधींविरोधात तक्रार केल्याची माहिती दिली. सत्यकी म्हणाले की, “माझे आजोबा दिवंगत श्री. विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी खोटे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपबद्दल आज मी त्यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे.”

अधिक वाचा  शिवराज सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेले वक्तव्य हे कपोकल्पित असून, पूर्वीसुद्धा त्यांनी सावरकरांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या आणि समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधी सांगतात ते खोटे सांगतात, कल्पना करून सांगतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतु सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love