Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune

मोदी आगामी लोकसभा पुण्यातून लढणार?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याचा दावा भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. (Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune?)

मोदी  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे. मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ बांधण्यात येत आहे. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *