The DNA of conspiracies is BJP's

लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत, मोदी सरकारची अधर्माकडे वाटचाल-गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वार्थापोटीच् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपने पुलवामा व भारत_पाकीस्तान’चा भावनात्मक मुद्दा ऊभा केल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘पत्रकार परीषदेत’ केला.

ते पुढे म्हणाले की, ‘४१ आरसीएफ जवानांच्या शहीदत्वावर’  मोदींच्या भाजपने मते ही मागितली, मात्र सुरक्षेच्या अक्षम्य चुकांमुळे’ सदर चा दुर्दैवी हल्ला होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एकावर ही दोषारोप दाखल न करणाऱ्या व ‘राजधर्माचे पालन न करणाऱ्या’ उन्मत्त मोदी सरकारच्या कृती ने पुलवामा’चे तत्कालीन राज्यपालांचे आक्षेप रास्त असल्याचेच सिध्द केले.. असे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

“अडाणी आर्थिक धोटाळ्यावर संसदेत उत्तरे न देणे, चिन च्या धुसखोरी वर, राष्ट्रीय संपत्ती मनमानीपणे निवडक ऊद्योजकांच्या घशात धालणे, राष्ट्रीय बँकाना करोडोंची फसवणूक व चोरी करून, चुना लावून विदेशात पसार झालेले मोदींचे व्यक्तिगत ओळखीतील बहुतांश गुजरात मधील उद्योजक व व्यापारी यांचे कडुन वसुलीचे वा त्यांचेवर कडक कारवाईचे कोणतेही संकेत मोदी सरकार कडून मिळत नाहीत”.. ही लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या सरकारची लोकशाहीतील ऊत्तरदायीत्व व जबाबदारी प्रती हेळसांड आहे..

त्यामुळे या दोन्ही प्रश्नांवर लवकरच  पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम ‘राजीव गांधी स्मारक समिती’ आयोजित करत असुन, पुढील आठवड्यात भाजप सोडुन मविआ तील तिन्ही पक्षांचे वतीने मोठा पुणेकर नागरीकांचे नागरी स्वाक्षरी अभियान राबवणार असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले व नागरीकांनी यात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधी मत नोंदवावे असे आवाहन केले.

देशात अण्णा हजारेंच्या आंदोलनातुन खोटे नाटे आरोप व ‘अच्छे दिन’ची स्वप्ने, काळा पैसा आणुन प्रत्येकी १५ लाख, प्रती वर्षी २ करोड रोजगार इ. इ. भरमसाठ लोभस आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सरकार आता मात्र लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत अधर्माकडे वाटचाल करत आहे.

२०१४ नंतर पासुन भाजप तील ‘संसदीय लोकशाही’ करीता संसदेत व बाहेरही संघर्ष करणारे व भाजपतील नेतृत्वाचे स्पर्धेतील उंचीचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज्य, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर आदी नेते मात्र नव्या भारतात वाचु शकले नाहीत, त्यांना तातडीने व योग्य उपचार का मिळु शकले नाहीत या विषयी खेद वाटतो असेही तिवारी म्हणाले.  

भारताच्या ४१ जवानांच्या ३५० किलोग्राम आरडीएक्स मोटारी द्वारे केलेल्या दहशती_हल्ल्याच्या हत्ये नंतर, तिन्ही दलांचे सुरक्षा प्रमुख, दिवंगत जन बिपीन रावत यांचे नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या बालाकोट वर केलेल्या सर्जीकल स्ट्राईक’चे श्रेय देखील “मोदी_शहांच्या नव्या भाजप”ने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घेतले.. त्या हल्ल्यात झाडे-झुडपांच्या शिवाय पाकिस्तानचे चिटपाखरू ही गेले नाही, ही वास्तवता त्याच वेळी माध्यमांतुनच समोर आली व पाकिस्ताननेही तसे वक्तव्य केले. मात्र या विषयी सत्य – ईतिहास व प्रत्यक्ष परीस्थितीची माहीती ज्ञात असलेले तत्कालीन जनरल बिपीन रावत मात्र दुर्दैवाने हेलीकॅाप्टर अपघातात मारले गेले व त्या अपघातास कारणीभुत ठरणाऱ्या एकाव ही अद्याप चौकशी – कारवाई होऊ घातल्याचे पहायला मिळालेले नाही. तिन्ही दलांचे प्रमुख व २०१९ च्या बालाकोट सर्जीकल स्ट्राईकचे शिल्पकार यांचे दुद्रैवी अपघात बाबत देखील “नव्या_भाजपला ना खेद .. ना खंत.. त्यांचे प्रथम स्मृती दिन देखील.. नव्या भारताच्या..विस्मरणांत” गेला.. ही देखील नव्या_भारताची शोकांतिका आहे, असे तिवारी यांनी नमूद केले.

“हिंदुत्वाचा बुरखा पांघरून, अधर्माने प्रेरीत सत्तेची वाटचाल” हीच .. नव्या_भाजप च्या नव्षा_भारताची ओळख..”….

हिंदुत्वाचा प्रसार व प्रचार हे एकतर संविधानीक सरकारचे काम नाही.. त्या करीतां हिंदू संत – धर्मगुरु व त्यांचे न्यास सक्षम व समर्थ आहेत.. राज्य कर्त्यांनी रयते प्रती अपेक्षीत लोकशाही व संविधानिक मुल्ये जोपासत.. राज_धर्माचे पालन केले पाहीजे..! जनतेच्या कररूपी पैशातुन सत्ता राबते आहे.. याचे भान व जाणीव राज्यकर्त्या सत्तापक्षाकडे असली पाहीजे..देशाच्या राष्ट्रीय सार्व. संपत्तीचे सत्तापक्ष हे विश्वस्त आहे.. मालक नव्हे..! मात्र या मुळ हेतुला बगल देऊन, लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत, मोदी सरकारची अधर्माकडे वाटचाल चालली असल्याची प्रखर टिका काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केली.. पत्रकार परीषदेचे आयोजन राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज ऊद्यान, पुणे व जेष्ठ काँग्रेसजन – रविवार कट्टा यांनी केले..

या प्रसंगी ..सर्वश्री … सुर्यकांत मारणे, सुभाषशेठ थोरवे, ॲड संदीप ताम्हणकर, युक्रांदचे संदिप बर्वे, आबा तरवडे, रामचंद्र शेडगे, भोला वांजळे, नंदूशेठ पापळ, प्रसन्न पाटील, संजय चौगुले, केदार गोराडे, महेश अंबिके, अशोक काळे, घनश्याम निम्हण, मंगेश झोरे, धनंजय भिलारे, रमाकांत शिंदे, विकास दवे, नरेश आवटे, ऊदय लेले इ कार्यकर्ते उपस्थित होते..!

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *