पुणे–देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला तुम्हाला बोलावलच कोणी? होतं असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला.
पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी आपण परत कोल्हापुरला जाण्याचे विधान केले होते. या विधानावर राजकीय प्रतिक्रीया उमटल्या. शनिवारी सकाळी उपमुख्य अजित पवार यांनी पाटील यांच्या विधानावर त्यांना बोलावले कोणी होते ? अशी प्रतिक्रीया दिली.
पवार म्हणाले, त्यांचे सरकार नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालेही नव्हते. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले. निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. उद्या लोकं कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होते, असा टोलाहि पवार यांनी लगावला.