सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

Supriya Sule and Sunetra Pawar will file nomination papers tomorrow
Supriya Sule and Sunetra Pawar will file nomination papers tomorrow

पुणे(प्रतिनिधि)–महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच  पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमिताने महायुतीच्या वतीने शक्ति प्रदर्शन करण्यात येणार असून  महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या तीन नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची पुण्यात जाहीर सभाही होणार आहे.

सुप्रिया सुळेही १८ एप्रिलला अर्ज भरणार

बारामतीतील प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी होणार आहे. नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढतीसाठी पवार आणि सुळे या दोघी येत्या गुरुवारी (ता. १८ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज पुण्यात भरणार आहेत.

अधिक वाचा  कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे- अरुंधती राय

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून प्रचार सभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. तसेच, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रांच्या माध्यमातून उमेदवार आपला प्रचार करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण कोणते स्टार प्रचारक बारामतीत सभा घेणार आहेत, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. बारामतीतील प्रचाराची सांगता पाच मे रोजी होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love