शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी: का म्हणाले चंद्रकांत पाटील असं?

राजकारण
Spread the love

पुणे-  अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. जेव्हा केव्हा शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. 

शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापुरला परत जाईन असे विधान केले होते. या विधानावर राजकीय प्रतिक्रीया उमटल्या. शनिवारी सकाळी उपमुख्य अजित पवार यांनी पाटील यांच्या विधानावर त्यांना बोलावले कोणी होते ? अशी प्रतिक्रीया दिली. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.मला पक्ष सांगेल तेव्हांच पुणे सोडेन, मला दिलेले मिशन पूर्ण झाल्यानंतरच मी कोल्हापुरला जाईन असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


 मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. घाबरूनही जाऊ नये. मी केंद्राने दिलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही. आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचं असतं, त्या अर्थी मी गिरीश बापटांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही. अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियाचा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी असा टोला त्यांनी लगावला.

आता त्यांनी खुशाल सीडी लावावी


‘सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली आता त्यांनी खुशाल सीडी लावावी असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी खडसे यांना ईडीने पाठविलेल्या नोटीस संदर्भात विचारले. यापुर्वी खडसे यांनी मला ईडीची नोटीस आली तर मी सीडी लावेन असा इशारा भाजपला दिला होता. त्यासंदर्भात पाटील म्हणाले, ‘‘ ईडी ही स्वायत्त संस्था आहे. काही झाले की त्याचे खापर हे केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रकार आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर सीडी लावू असे त्यांनी सांगितले होते. आता खडसे यांनी सीडी लावावी, असे न फुटणारे बॉम्ब टाकण्याचे प्रकार खुप झाले, असा टोला त्यांनी लगावला

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *