उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?


पुणे-उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या भाषणावेळी भाजपचा ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील तर मला माहीत नाही

अधिक वाचा  येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये ‘मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या तीन-चार दिवसांत काय ते कळेल,’ असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. याबाबत अजित पवार यांना विचरले असता चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

पवार म्हणाले, ‘मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींना माहीत असेल. मी विकासकामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ही परिस्थिती सांभाळून राज्यात विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही सकाळपासूनच कामाला लागतो.

मराठा सेवा संघाला काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील

अधिक वाचा  उद्धव ठाकरे व अजित पवार सपशेल अपयशी ठरले

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकातील लेखामधून भाजपशी युती करण्याचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ‘काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने Open in app असतात. अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love