देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता : ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे–देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते करत नाहीत असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता, असेही सांगितले. त्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला तेव्हा असाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का, अशी विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘त्याची काहीही गरज नव्हती, कारण यांनी केला देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे सारखे ते करत नाहीत.’ उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप पाटील. अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते म्हणाले, ‘राज्यात काय चाललंय त्याची त्यांना माहिती नसते. देवेंद्र फडणवीसांच्या वयावर जाऊ नका. शिवसेनेने त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष मुख्यमंत्री खूप वर्षानंतर राहिला आहे. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी खूप प्रयत्न झाले होते. पण देवेंद्र फडणवीस या सर्वांना पुरून उरले होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही नेता धुतल्या तांदळासारखा होतो का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘असं काहीही नाही. नारायण राणेंवर कारवाई करायची की नाही, हे आता राज्य सरकारवर अवलंबून आहे. त्यांना वाटलं तर ते कधीही कारवाई करू शकतात. आणि अजित पवार यांच्यावरील कारवाईची प्रक्रियाही सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये अजित पवारांचे देखील नाव आहे.

येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील

‘शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचही चंद्रकांत पाटील यांनी केलं. येत्या दोन दिवसांत दोन कोंग्रेस नेत्यांचे दोन विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं ते म्हणाले.

 मुश्रीफांना ऑफर नव्हती

हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, वाहिन्यांना सोबत घ्यायचं, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची. मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असंही पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *