आठ प्रकारच्या संक्रमणशील आजारांसाठी आता एकच प्रमाणित पॉलीसी

आरोग्य
Spread the love

मुंबई(ऑनलाईन टीम)—मेडिक्लेम पॉलिसी (आरोग्य विमा) म्हटला की आपला गोंधळ उडतो. त्यामध्ये कुठले आजार कव्हर होणार याबाबत आपल्याला अनेक शंका असतात. संक्रमित आजारांबाबत तर विविध विमा कंपन्यांच्या याबाबतच्या लाभ, अटी, कालावधी विमा कंपनीनुसार बदलत असल्याने अधिक संभ्रम पॉलिसीधारकांच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु आता हा संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDA) डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया आदी प्राण्यांकडून संक्रमित होणाऱ्या (व्हेक्टर बॉर्न) आजारांसाठी एकच प्रमाणित पॉलिसी तयार करण्याविषयीची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या प्रस्तावित पॉलिसीबाबत ‘इर्डा’ने २७ नोव्हेंबरपर्यंत सूचना व प्रस्ताव मागवले आहेत.

नवी प्रस्तावित प्रमाणित आरोग्यविमा पॉलिसी समजण्यास सोपी असणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अन्य आरोग्यविमा पॉलिसींच्या काही नियम व अटी समान राहणार आहेत. डेंगी, मलेरिया व चिकुनगुनिया या आजारांसाठी रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास तो खर्च या प्रमाणित पॉलिसीअंतर्गत मिळणार आहे. यासंदर्भातील आराखडा ‘इर्डा’ (IRDA)  आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

इर्डाने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यानुसार, ही प्रमाणित पॉलिसी आठ प्रकारच्या संक्रमणशील आजारांसाठी विमा कवच देईल. त्यामध्ये डेंगी ताप, मलेरिया, फायलेरिया (लिम्फॅटिक फायलेरियासिस), काला आजार, चिकुनगुनिया, जपानी एन्सिफॅलायटिस आणि झिंका विषाणूजण्य आजार यांचा समावेश आहे. या पॉलिसीचे नाव ‘केक्टर बॉर्न डिसिझ हेल्थ पॉलिसी’ असे असेल. या मूळ नावापुढे संबंधित विमा कंपनीचे नाव येईल. या पॉलिसीअंतर्गत वरील आजारांपैकी कोणताही एक किंवा यापैकी काही आजारांसाठी विमा कवच दिले जाईल.

या पॉलिसीअंतर्गत रुग्णालयात भरती झात्याचा खर्च वरील संक्रमणशील (व्हेक्टर बॉर्न) आजारांसाठी दिला जाईल. डे-केअर खर्चही दिला जाणार आहे. वर दिलेल्या आठ व्हेक्टर बॉर्न आजारांपैको एखाद्या आजारासाठी ही पॉलिसी घेतली असेल आणि हा आजार एकदा बरा झाल्यावर ४५ दिवसांत उलटल्यास त्यासाठीही विमा संरक्षण मिळणार आहे.

Source : म.टा.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *