gtag('js', new Date());
  • Home
  • आरोग्य
  • दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ
Image

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

Spread the love

पुणे- दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली.

या सहाजणांमध्ये मुंबई, मीरा भाईंदर, डोंबिवली आणि पुण्यातील प्रत्येकी एकाचा तर पिंपरी-चिंचवड मधील दोघांचा समावेश आहे. या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली की नाही हे शोधण्यासाठी त्याची जिनोमिक स्किवेन्सिंग करण्यात येणार आहे. ही किचकट प्रक्रिया आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी सात दिवस लागणार आहे. सात दिवसानंतर नेमकं निदान होणार आहे, असं ते म्हणाले.

अधिक वाचा  लोकराजा छत्रपती शाहू महाराज

ओमिक्रॉन हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तातडीने पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे दोन गटात वाटप केले आहे. जिल्हा निहाय त्याची वर्गवारी केली आहे. आतापर्यंत सहा प्रवासी दक्षिण आफ्रिका, नायजेरीया आणि झांबियातून आले आहेत. ते पॉझिटीव्ह आले आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.

25 नोव्हेंबरला केंद्र सरकारने नव्या विषाणूची दखल घेतली. आपण परदेशी प्रवाशांवर फोकस केला आहे. ज्या देशात ओमिक्रॉन आढळला आहे, त्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाची आपण आरटीपीसीआर करत आहोत. त्याला लक्षणे असो किंवा नसो, त्याने लस घेतली असो किंवा नसो… प्रत्येकाची आपण आरटीपीसीआर चाचणी करत आहोत. पॉझिटिव्ह आली की आपण ती जेनेटिक्स सिक्वेन्सला पाठवत आहोत. निगेटिव्ह चाचणी आली तरी त्याला आपण सात दिवस क्वॉरंटाईन ठेवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अधिक वाचा  आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय त्यांना सात दिवस क्वॉरंटाईनही करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरीया राज्यातील डॉक्टर सांगत आहेत. या आजाराची लागण झालेल्यांना प्रचंड थकवा येत असल्याचं कळतं. अभ्यासाअंती या आजाराची रचना समजेल. तसेच मध्यरात्रीपासून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे, आपला आरोग्य विभाग अॅलर्टवर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Related Posts

पुण्यात उभारले जाणार ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’; कॅन्सर सेंटरपासून ॲनिमल हॉस्पिटलपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–“मंगेशकर कुटुंबियांनी केवळ संगीताचीच सेवा केली नाही, तर देशप्रेम आणि समाजसेवेचा एक नवा आदर्श समाजासमोर…


Spread the love
ByByNews24Pune Apr 16, 2026

हडपसरमध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या नवीन केंद्राचे थाटात उद्घाटन

Spread the love

Spread the love पुणे (प्रतिनिधी):पुणे आणि परिसरातील निपुत्रिक दांपत्यांना आता जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक प्रजनन उपचार सुविधा हडपसरमध्ये…


Spread the love
ByByNews24Pune Feb 16, 2026

Mohan Bhagvat : हिंदू राष्ट्र’ ही सांस्कृतिक संकल्पना, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवरच देशाचा विकास शक्य: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Spread the love

Spread the love Mohan Bhagvat: “जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर भारतीय चिंतन पद्धती हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे भारताने स्वदेशी…


Spread the love
ByByNews24Pune Oct 2, 2025

संचेती रुग्णालय आता स्ट्रोक रेडी सेंटर : ब्रेन स्ट्रोकवर मिळणार तातडीने उपचार

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया’ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर’ म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन…


Spread the love
ByByNews24Pune Sep 24, 2025

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

by News24Pune time to read: <1 min
0