भयानक:पत्नीनेच केली युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन हत्या


पुणे(प्रतिनिधि)— कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून पत्नीनेच मॉर्निंग वॉकचा बहाणा करत युवकांची  हत्या केल्याचं समोर आलं आहे. देहूरोड येथे मंगळवारी या हत्येची घटना समोर आली होती.  युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.देहूरोड पोलिसांनी  केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पत्नीला आटक केली आहे. ऋतू गायकवाड (वय – 20) असे या महिलेचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयूर गायकवाड या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं होत.  मयुरच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

अधिक वाचा  बाल लैंगिक अत्याचार गुन्हयात उच्च न्यायालाने दिला अटकपूर्व जामीन..

पती मयूर गायकवाडची हत्या करण्यासाठी पत्नी ऋतू गायकवाडने हिने मॉर्निंग वॉकचा बहाणा केला होता. गेली चार दिवस ती शेजाऱ्यांना घेऊन मॉर्निंग वॉकला जात असे. मंगळवारी हत्या करण्यापूर्वीही तिने तोच दिनक्रम ठेवला. पण पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळली आणि तिचे बिंग फुटले. कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. गुन्हे शाखा आणि देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला

सुरुवातीला पोलिसांनी मयुरची पत्नी ऋतू गायकवाडला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यावेळी तिने मयूर नेहमीच लैंगिक छळ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिच्याकडे त्याला संपवण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता असं तिने सांगितलं. त्यासाठी तिने 4 दिवसांपासून प्लान केला होता. तिने शेजारी राहणारी एक महिला आणि काही लहान मुलांसोबत मॉर्निंग वॉकला जाण्यास सुरुवात केली. ती नवरा घरी एकटा असण्याची वाट पाहत होती. सोमवारी रात्री तिची सासू रात्रपाळीला ड्युटीवर गेली आणि तिचा दीरही घरी येणार नव्हता. या संधीचा तिने फायदा उचलला.

अधिक वाचा  पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची लैंगिक अत्याचार करून हत्या

ऋतूने रात्रभर मयूरला संपवण्याचा विचार केला. सकाळी ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेली. तिथून आल्यावर तिने मयूर झोपेत असताना त्याच्या डोक्यावर आणि मानेवर फावड्याने वार केले. पतीला मारत असताना तिच्या कपड्यांवर जे रक्त उडालं ते तिने पाण्याने साफ केलं आणि लहान मुलांसोबत सायकलिंग करायला निघून गेली. त्यानंतर घरी परत आल्यानंतर अज्ञातांनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या तपासात तिचं बिंग फुटलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love