फेसबुकच्या मैत्रीतून प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांची मागणी : तरुणाची आत्महत्या


पुणे– फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून महिलने वीस वर्षीय तरुणाला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पैशांची मागणी केली. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने मानसिक तणावात असलेल्या या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडली आहे. दरम्यान, या संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची आणि संबंधित महिलेची फेसबुकवर ओळख झाली होती. महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा तरुण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत होता. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट झाले. हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून वीस वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला. हा सर्व प्रकार १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत घडला. अखेर तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात विवाहित महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  प्रसिध्द ज्वेलर्सचा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न