सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना 10 वर्षांची शिक्षा

क्राईम
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)— सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी निष्णात नसताना आणि कुठल्याही तज्ञाची मदत न घेता सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना दोषी ठरवत नायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच दोघांनही प्रत्येकी अडीच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.  आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली.

डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०) आणि सचिन हरी देशपांडे (वय ३९) अशी शिक्षा झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर भूल तज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजश्री जगताप असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे nav आहे.

 राजश्री यांचे पती अनिल जगताप यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. डॉ. शिंपी यांचे किवळे परिसरात अथश्री रुग्णालय आहे. डॉ. सचिन देशपांडे हे तेथे काम करत होते. दोघांचे बीएएमएस शिक्षण झाले असून ते सिझरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नाहीत. ३० एप्रिल २०१२ रोजी डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात राजश्री यांना दाखल करण्यात आले होते. सीझर करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राजश्री यांची तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या काळात मोठा रक्तस्त्राव झाल्याने राजश्री यांचा मृत्यु झाला. डॉक्टर प्रसुती प्रक्रियेत तज्ञ व सिझेरियन आपॅरेशन करण्यास सक्षम नसताना त्यांनी निष्काळजीपणे ऑपरेशन केल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *