Murder by stabbing with sharp weapon and coyote on Sinhagad road

#खळबळजनक : सिंहगड रस्त्यावर धारदार शस्त्राने आणि कोयत्याने सपासप वार करून खून

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक विना विघ्न पार पडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर खळबळ जनक घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉज जवळ लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून (Murder) झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाली. (Murder by stabbing with sharp weapon and coyote on Sinhagad road)

विजय ढोणे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्यांचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मैत्रीचे संबंध होते तसेच अनेक राजकारणी व्यक्तींची त्यांचे चांगले संबंध होते. क्वालिटी लॉजमधून बाहेर पडत असताना त्यांच्यावर पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार हत्याराने आणि कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. वार केल्यानंतर ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना समजल्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले

ढुमे यांचा खून कुठल्या कारणास्तव झाला आणि तो कोणी केला याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसून सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.  रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *