मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आसावरी सचिन धुमाळ ( वय – २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ (३३), साससरे वसंत पांडुरंग धुमाळ (६५), सासु वंदना वसंत धुमाळ (६०), दीर स्वप्नील वसंत धुमाळ (२८), जाऊ अंजली स्वप्नील धुमाळ (२५) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे.

याप्रकरणी आसावरी हिचा भाऊ रोहन गोविंद पोळ (वय-२५, रा. जेजुरी, पुणे) याने पोलीसांकडे आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. सचिन व आसावरी यांचा विवाह सन २०१४ मध्ये थाटामाटात पार पडला होता, त्यानंतर आसावरी पुण्यातील फुरसुंगी भागात सासरी पतीसह रहाण्यास आली होती. लग्न झाल्यानंतर तिला मुलबाळ होत नसल्याने सासरचे लोक तिचा मानसिक, शाररिक छळ करत होते. तिचे लग्न झालेले असताना सुध्दा तिला मुलबाळ होत नसल्याचे कारणावरुन तिचा पती सचिन धुमाळ याला दुसरी मुलगी पाहण्यासाठी तिला जबरदस्तीने सासरचे लोक घेऊन जात होते. तसेच सचिन ही तिच्याशी कौटुंबिक वादातून शिवीगाळ करुन मारहाण करत होता. या छळाला कंटाळून आसावरी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत हडपसर पोलीस पुढील तपास करत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *