ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या -डॉ. विश्वजीत कदम


पुणे-काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा  महाविकास आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी  ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या आहे ,अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे. आदरणीय राहुल आणि प्रियंकाजी हे दोघेही उत्तर प्रदेश मधील दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांना अटकाव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे आहे. सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या देशामधील आणि उत्तर प्रदेश मधील जुलमी राजसत्तेला जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Nikhil Wagle: निखिल वागळे यांच्या विरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार