कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार?


नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेड नाही, ऑक्सीजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनकहा तुटवडा आणि काळा बाजार यामुळे जनता हैराण झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केल्याने पुन्हा एकदा चिंतेचे आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन राज्य सरकार या लाटेला तोंड देण्यासाठी तयारीला लागले आहे.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यादृष्टीने आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, देशात सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाटेचा धोका वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे.  

अधिक वाचा  खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करा : सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र

कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना साह्य करून परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावं लागतं आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू, असं ते म्हणाले.

दरम्यान, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी सुरू असून ऑक्सीजनसाठी महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे राज्य सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी दीड महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आठ ऑक्सीजन प्लांट उभारण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. रेमडेसीविर इंजेक्शन ,ऑक्सीजन स्टोरेज टॅंक आणि ऑक्सीजनसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा सरकार विचार करीत आहे. तसेच सप्टेंबर पर्यन्त जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा आणि ऑक्सीजनची पूर्तता करण्याचे टार्गेट राज्य सरकारने ठेवले आहे.

अधिक वाचा  विश्वशांती,दहशतवाद मुक्तीसाठी ११ सप्टेंबर रोजी एक लाख शिवभक्त करणार वैश्विक महारुद्राभिषेक

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love