सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले : राज्यांना मिळणार 300 रुपयांना एक डोस

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर कमी करण्यासाठी सहमति दर्शवली आहे. त्यामुळे सिरमची कोविशील्ड लसीचा एक डोस राज्य सरकारांना आता 300 रुपयांना मिळणार आहे. या अगोदर सिरमने राज्य सरकारसाठी हा दर 400 रुपये जाहीर केला होता. मात्र, त्यावरून पडसाद उमटले होते. देशात लसीचे एकसमान दर असावेत यासाठी आंदोलनांला सुरुवातही झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

सीएनबीसी टीव्ही 18 ने दिलेल्या वृत्तानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याशी बोलल्यानंतर सांगितले की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) राज्य सरकारांना पुरवल्या जाणाऱ्या कोविशील्ड लसीची किंमती कमी करण्यास सहमती दर्शविली आहे.

“राज्यांसाठी  कोविशील्ड लसीची किंमत 25 टक्क्यांनी कमी करून ती 300 रुपये प्रतिडोस करण्याचा एक परोपकारी निर्णय घेतला आहे. राज्यांचा निधी वाचवण्याच्या हिताच्या दृष्टीने हे करीत असल्याचे आदर पूनावाला यांनी म्हटल्याचे”, सीएनबीसी टीव्ही 18 ने म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *