महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल – राधाकृष्ण विखे पाटील


पुणे–राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकत नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सारथी संस्था अशा विविध विषयांबाबत त्यांनी भाष्य केले.

कॉँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी इंदापूर येथील एका कार्यक्रमात, 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती.  तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

अधिक वाचा  ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा- राधाकृष्ण विखे पाटील

सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेशी पूर्ण सहमत

शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, दुर्दैवाने कोंग्रेस पक्षातील विचार मंथनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. कोंग्रेस पक्षात मी अनेक वर्षे काम केले आहे. मंत्री महणून, राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून साडेचार वर्षे काम केले आहे. त्यामुळे कदाचित मी विविध पदे, मंत्रीपदे भोगली म्हणून मी बोलतो त्यामुळे माझ्यावर टीकाही होईल. परंतु, आम्ही सुद्धा पक्षाकरता झिजलो आहे. पक्षाच्या सक्षमीकरता काही भूमिका मांडली तर ती पक्षविरोधी भूमिका म्हणून समजली गेली. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे मूठभर लोक सत्तेत आहेत. जे मंत्री झाले, त्यातील काही मंत्रीही नाराज आहेत. ज्यांना मलईदार  असलेले खाते मिळाले तेच मंत्री फक्त खुश आहेत. त्यांचे मंत्रिपद काढून घेतले तर ते पक्षाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतील. त्यामुळे शिंदे साहेबांनी जी भावना व्यक्त केले त्याला आपण पूर्णपणे सहमत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love