Stand with BJP to realize Narendra Modi's dream of a developed India

नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहा : आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यामध्ये मान्यवरांचे आवाहन

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले असून ते पूर्ण करण्यासाठी विकसित पुणे असणे आवश्यक आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी उभे राहावे, असं आवाहन आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केले. भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.  

पुणे लोकसभा भाजपा- महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने वाळवेकर लॉन्स येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजीराव रेणुसे व प्रसिद्ध वस्ताद नरहरी चोरगे व सर्व मान्यवरांच्या हस्ते मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भीमरावअण्णा तापकीर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, श्री. शंकरशेठ जगताप, श्री. बाबा मिसाळ, श्री. विजयशेठ जगताप, श्री. अजय खेडेकर, श्री. राजेंद्र शिळीमकर, श्री. महेश वाबळे, श्री. अशोक येनपुरे, श्री. व्यंकोजी खोपडे, श्री. रोहिदास उंदरे, श्री. दत्ता सागरे, श्री. अभय मांढरे, श्री. दिलीप काळोखे आदी रेणुसे मित्रपरिवार उपस्थित होता.

यावेळी भाषाप्रभू डॉ. पंकज महाराज गावडे यांनी उपस्थितांना संबोधित केले, ते म्हणाले ‘आजच्या परिस्थितीत विकास हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जे चांगले आहे तेच पुढे जात राहणे, महत्त्वाचे आहे. सगळे एकत्र येऊन जेव्हा समाजात चांगले काम केले जाते तेच काम टिकते आणि समाजाला मान्य होते. त्यामुळे या पुढील काळात सुद्धा आपण सगळेजण एकत्रितपणे काम करूया’

दीपकभाऊ मानकर म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात मुरलीअण्णांच्या घरातील 35 माणसं रुग्णालयात भरती असतानादेखील महापौर म्हणून त्यांनी केलेले काम लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे त्या कामाचीच दखल घेतली जाईल असे वाटते. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने चांगली सुरुवात केली आहे, असे मेळावे पुणे शहरात आणखी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

युवराज रेणुसे यांनी स्वागत केले, अॅड. दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *