व्हिजहॅक टेक्नॉलॉजीज जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून करणार

तंत्रज्ञान पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -सायबर सुरक्षा प्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था व्हिजहॅक टेक्नॉलॉजी ने पुण्याला प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याची सिद्धता केली आहे. देशात आणि जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून होऊ शकेल अशी योजना व्हिजहॅक टेक्नॉलॉजीजने आखली आहे.

व्हिजहॅक तर्फे सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. हे अभ्यासक्रम विस्तृत तर आहेतच, शिवाय विषयाचे सखोल ज्ञानही त्यातून मिळते.  भारतातील पहिला सायबर संरक्षण ड्युअल सर्टिफिकेट प्रगत अभ्यासक्रम आयआयटी जोधपूर, टीआयएससी  व्हिजहॅक आणि सायबिन्ट इस्त्रायल यांनी तयार केला आहे.  सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम आयआयटी जोधपूर चे अध्यापक आणि इस्त्रायलमधील प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिकविला जातो. क्लाउड कॉम्प्यूटिंग तंत्रज्ञानाच्या आधारे अद्ययावत हॅकिंग टूल्स च्या साह्याने हा  अभ्यासक्रम शिकविला जातो.  नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर सायबर सिक्युरिटी(एनआयसीइ),अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी वर्कफोर्स फ्रेमवर्क आणि  कॉम्प टीआयए सिक्युरिटी प्लस या अभ्यासक्रमाशी संलग्न हा अभ्यासक्रम आहे. व्हिजहॅक सायबर सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षित व्यावसायिकांना मोठ्या संख्येने भरती करत असते आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या भारतातील आणि परदेशातील व्यवसायात नोकरी देते तसेच सायबर सुरक्षा  क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे नोकरी मिळवून देते.  शैक्षणिक कामगिरी आणि व्यक्तिगत क्षमता या आधारे अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.

पुण्यासाठी या क्षेत्राच्या भवितव्याबद्दल व्हिजहॅक टेक्नॉलॉजीज चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक राय म्हणाले, पुण्यामधे तंत्रज्ञान शिक्षणाला अतिशय पोषक वातावरण आहे. व्हिजहॅक टेक्नॉलॉजीज या शहरात मोठ्या संख्येने व्यावसायिक तयार करू शकेल  आणि देशाची सायबर सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करू शकेल. या शहरात देशाच्या कोनाकोप-यातून युवक शिक्षणासाठी येतात. यातूनच आम्हाला गुणी व्यावसायिक घडवता येतील अशी मला खात्री आहे. ”

ते पुढे म्हणाले, “व्हिजहॅक चे अभ्यासक्रम विस्तृत तर आहेतच, शिवाय विषयातील संकल्पनांचे सखोल ज्ञानही त्यातून मिळते. आम्ही जागतिक पातळीवरची शिक्षणपद्धती अवलंबिली असून  विद्यार्थ्सांना त्याचा मोठा फायदा होतो. भारतातील आयआयटी संस्था, अमेरिकेतील तसेच इस्त्रायल मधील एमआयटी सारख्या संस्थांचे सहकार्य मिळविले आहे त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गरजेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना सरस कामगिरीसाठी सक्षम करतात. सायबर सुरक्षा हा विषय भौगोलिक मर्यादांच्या पलिकडचा आहे. त्यामुळे आमचे प्रशिक्षित व्यावसायिक जगात कोठेही काम करून स्वत:चा उत्कर्ष साधू शकतील. व्हिजहॅक चे प्रमाणपत्र देताना आम्ही जागतिक पातळीवरचे मापदंड लावतो आणि आमच्या अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा उद्योगात प्रत्यक्ष काम करताना लागणारी क्षमता देणारे विषय समाविष्ट करतो. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो आणि त्याना काम मिळविण्यासाठी साह्य करतो. ”

तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीशी सुसंगत, सायबर सुरक्षा  क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. या क्षेत्राची २०१२ ते २०२२ या दशकात  ३७ टक्के म्हणजे इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जास्त वाढ होईल असा ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स चा अंदाज आहे. या क्षेत्रातील पगारही  २०१३ ते २०२१ या काळात ३५० टक्के ने वाढले आहेत.  इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टिम सिक्युरिटी सर्टिफिकेशन कन्सॉर्शियम (आयएससी) च्या अंदाजानुसार सरकारी आणि खाजगी क्षेत्रांत मिळून ४० लाख सायबर सुरक्षा व्यावसायिकांची आज गरज आहे. सायबर सुरक्षा प्रशिक्षण  प्रमाणपत्र मिळवणे किती लाभदायक आहे हे या आकडेवारीवरून सिद्ध होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *