मल्टी-स्पेशालिटी आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप फर्स्टक्यूअर हेल्थचा पुण्यात विस्तार

आरोग्य
Spread the love

पुणे- नोईडामधील आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी फर्स्टक्यूअर हेल्थ आता पुण्यातील आपला विस्तार वाढवत आहे. ही अनोखी स्टार्टअप कंपनी योग्य खर्चात योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार उपलब्ध करून, देऊन रुग्णांना मदत करते. तसेच हे स्टार्टअप रुग्णांच्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा आणि कागदपत्रांची संपूर्ण प्रक्रियासुद्धा हाताळते .मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पद्धतीच्या निवडक शस्त्रक्रिया   त्या हॉस्पिटलशिवाय अन्यत्रही कमी किमतीत उपलब्ध करून देते. त्यामुळे  रुग्णांना  अधिक किफायती आणि सहज सुलभ होतात.

हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे विद्यार्थी आणि चार्टर्ड अकाऊंटंट निखिल बंसल  यांच्या संकल्पनेतून भोपाळ येथे डिसेंबर २०२१ मध्ये  फर्स्टक्यूअर हेल्थची स्थापना  स्थापना करण्यात आली .या स्टार्टअपकडे आज ७० पेक्षा अधिक तज्ञ सर्जन, ५० पेक्षा अधिक हॉस्पिटल्स आणि क्लिनिक आहेत. संपूर्ण नवी दिल्ली, नोईडा, गुरगांव, फरिदाबाद, पुणे आणि भोपाळमध्ये ४० पेक्षा अधिक वेगवेगळे उपचार प्रदान करत आहेत. ही एक मजबूत नेटवर्क-चेन असून प्रमुख हॉस्पिटलच्या सहकार्याने या स्टार्टअपची उभारणी करण्यात आली  आहे. या स्टार्टअपचा मुख्य उद्देश हा  किफायती दरांमध्ये सुलभ आणि प्रमाणित उपचार उपलब्ध करून देणे हा आहे.

कमी किमतीत उत्तम अनुभव आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा हैद्राबाद आणि बंगळुरू येथील रुग्णांना उपलब्ध करून देण्याची तसेच शेकडो हॉस्पिटल्सचे आधुनिकीकरण करून आणि त्यांच्या सुविधांचा उत्तम उपयोग करून त्यांची  सुधारणा  करणे. या स्टार्टअपची  योजना आहे. मिनिमल इनव्हेजिव सर्जरी लोकांना त्यांच्या घराजवळ सुलभ आणि किफायतशीरपणे  येत्या ५ वर्षांमध्ये एक सुस्थापित विश्वासार्ह ब्रँड होऊन मध्यम/छोट्या आकारांच्या हॉस्पिटलमधील असंघटित आणि विखुरलेल्या आरोग्य सेवांना संस्थात्मक रूप देण्याचे आमचे लक्ष्य आहे. या सेवांचे सध्या भारतातील प्रमाण ८० – ९० टक्के  आहे. 

फर्स्टक्यूअर हेल्थचे संस्थापक निखिल बंसल म्हणाले  की भारतातील आरोग्य  क्षेत्रात क्रांती घडवून आणणे, हे आमचे ध्येय  आहे. पुण्यात आम्ही प्रॉक्टॉलॉजी, लॅपॅरोस्कोपी आणि युरोलॉजीशी संबंधित उपचार पुरवण्यासाठी अगोदरच १६ डॉक्टर आणि १० हॉस्पिटल्सना सोबत घेतले आहे. ही संख्या लवकरच आम्ही ४० डॉक्टर आणि १८ हॉस्पिटल्सपर्यंत वाढवून त्यात गायनाकॉलॉजी, आर्थोपेडिक आणि ऑप्थॅमोलॉजी यांच्याशी संबंधित उपचारांचा समावेश करू. येत्या काळात दर महिना २ हजारापेक्षा अधिक वापरकर्त्यांपर्यंच पोचून १०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याची आम्हाला अपेक्षा आहे 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *