त्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं.. असे म्हणत उदयनराजे झाले भाऊक …

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये. हा मुद्दा राजकारण म्हणून पाहू नये, असं आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केलं. मला पुढचं दिसतं. हा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आज याने काही बोलायचं उद्या त्याने काही बोलायचं. किती अवहेलना सहन करायची? पण आता आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.ज्या राज्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो, त्या राजासाठी तुम्ही कधी जागे व्हाल? त्यांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना. त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे , असे बोलताना वेदना होतात. त्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं, असे म्हणत उदयनराजे भाऊक झाले .

काही लोक म्हणतात जुना विचार. मग नवीन विचार सांगा ना? प्रत्येकाचा आदर्श आजही महाराजच आहे. प्रत्येक धर्माचा शिवाजी महाराजांनी सन्मान केला. प्रत्येक धर्मस्थळांना इनाम दिलं. त्या राजाचा अपमान होत असताना आपण शांत राहणार का? असा संतप्त सवाल त्यांनी केला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काही विकृत प्रवृत्तीकडून वारंवार अपमान केला जात आहे. ही विकृती  हटवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि सन्मान जतन करण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात राज्यभरातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आणि या बैठकीत येत्या ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

येत्या ३ डिसेंबरला उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवचरित्र वाचन होणार आहे आणि त्यानंतर आक्रोश व्यक्त होणार आहे. ज्या ज्या लोकांना वाटत आहे त्या त्या लोकांनी रायगडावर यावे, असे आवाहनही उदयनराजे यांनी केले.

राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्याविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की याबाबत मी ३ तारखेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार आहे.आणि राज्यपाल यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. आणि या भेटी नंतर मी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *