कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.


पुणे-  पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या लोकार्पण सोहळा पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. दोघेही एका व्यासपीठावर येणार म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते सभागृहाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना भिडले. शरद पवार झिंदाबाद, अजित पवार झिंदाबाद, एकचा वादा , अजितदादा  अशा घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देत होते तर भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी झिंदाबाद,  देवेंद्र फडणवीस झिंदाबाद, गिरीश बापट झिंदाबाद आणि जय श्रीरामच्या घोषणा देत होते. कार्यक्रम सुरु होताना आणि संपल्यानंतरही हे घोषणायुद्ध सुरु होते. त्यामुळे सभागृहाबाहेर एकाच गोंधळ उडाला होता.

अधिक वाचा  अजित पवार यांना कोरोनाची लागण:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

बाहेर कार्यकर्ते कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले असताना आत कार्यक्रमात मात्र, विरोधक नेत्यांमध्ये मनोमिलन आणि एकवाक्यता असे विरोधी चित्र या निमित्ताने पहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतला सुरुवातच अजितदादा आणि फडणवीस एकत्र येण्याच्या मिडियातील चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त करून केली. आम्ही एकत्र येणार याची लोकांपेक्षा जास्त उत्कंटा मिडियालाच आहे. दोन दिवस अगोदर तर दोन दिवस नंतर याची चर्चा सुरु  असते. आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? असा सवाल करत दादा मिडियाला बातम्या मिळाव्यात म्हणून आपण सारखं एकत्र आले पाहिजे. एक तर तुम्ही मला चहाला बोलवत जा, नाहीतर माझ्याकडे चहाला येत जा असे सांगत विकासाची कामे आणि शहराची कामे असतील तर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचे असते असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  संजय राऊत यांच्या 'हरामखोर' या विधानावर अमृता फडणवीस यांचा टोला; काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अजित दादांनीही रोज त्याच त्याच बातम्या देऊन नवीन बातम्या नाही मिळाल्या नाही की मिडिया अशा बातम्या देतात असे नमूद केले. तर हातात हात घालून काम मूलभूत गरजांच्या बाबतीत एकत्र येऊन विचार होणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महापौर, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या प्रास्ताविकात राजकीय मतभेद आणि राजकीय विरोधक एकत्र आणून अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे काम कठीण असते. मात्र, नेत्यांना एकत्र येण्यामध्ये अडचण नसते, आपल्याला असते असे महापौर म्हणाले. देवेंद्रजी म्हणायचे दादांची वेळ घ्या, दादा म्हणायचे देवेंद्रजी यांची वेळ घ्या आणि दोघांच्या तारखा घेण्यात  काही अडचण आली नाही असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love