The opposition has no leader, no policy and no intention

विरोधकांकडे नेता,नीती आणि नियत नाही- देवेंद्र फडणवीस : मुरलीधर मोहोळ यांचा शक्ति प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन करीत गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, स्व. खासदार बापट साहेब यांनी प्रचंड काम पुण्यामध्ये केलं आणि आता मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे.  प्रचंड मताने मोहोळ निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या सह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोफ्लडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्या दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला.

विरोधकांकडे नेता, नीती आणि नियत नाही- देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या विकासाच्या व्हीजनबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, पुण्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे हे मोदी सरकारमुळे आणि महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर म्हणून, देशातलं आयटी कॅपिटल म्हणून आणि देशातलं टेक्नॉलॉजी कॅपिटल म्हणून विकसित करायचं आहे.  

पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांचे काय व्हीजन आहे? असा सवाल करत ते व्हीजन लेस,  डायरेक्शन लेस आहेत. त्यांच्याकडे नेता, नीती आणि नियत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का?

दरम्यान, ‘५४२ जागांपैकी जे १० जागा लढवत आहेत, ते जाहीरनामा प्रकाशित करत आहेत. आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? ‘असा उपरोधिक सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शरद पवारांवर टीका केली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये, मोदींनी हे केलं नाही म्हणून आम्हाला करावं लागतं आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीने हा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘५४२जागांपैकी जे १० जागा लढवत आहेत, ते जाहीरनामा प्रकाशित करत आहेत. आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? ‘ असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता जवळजवळ सुटला आहे. गेल्या वेळेपेक्षा महायुतीली निश्चितच चांगलं यश मिळेल आणि गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मी आणि इतर सर्व घट पक्ष सोबत आहोत, असं सांगत महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पदयात्रेची क्षणचित्रे

  • भर उन्हामधील पदयात्रेत आबाल वृद्धांचा उत्साहात सहभाग
  • रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी
  • दिव्यांग व्यक्तिंचा तीनचाकी वाहनांतून सहभाग
  • मुस्लिम मतदार विशेषतः महिलांचा मोठा सहभाग
  • पक्षांचे नाव व चिन्ह असलेले गमछे गळ्यात घालून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
  • चौकाचौकात पुष्पहार घालून, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल व बँड पथकाने स्वागत
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *