खवय्या पुणेकरांसाठी जेमी ओलिवरस पिज्जेरियाचा पुण्यात शुभारंभ


पुणे- पिझ्झा, डेसर्टस आणि इतर ईटालियन पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवणारा  जेमी ओलिवरस पिज्जेरिया ह्या इंटरनॅशनल फूड ब्रँडचे भारतातील १८ वे आउटलेट पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे दुसऱ्या मजल्यावर सुरु झाले आहे.

२०१५ पासून भारतात सुरु झालेले जेमी ओलिवरस पिज्जेरिया हे कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट असून त्याची आसन क्षमता प्रत्येक आऊटलेटमागे ५०–६० व्यक्तींची आहे. येथील नीपॉलिटन पिझ्जा,ड्रिंक्स आणि डेझर्ट ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.   

क्लासिक टॉपिंग्जपासून ते अनेक वेगवेगळ्या चवींचा हा पिझ्झा जेमी ओलिवरस मध्ये उपलब्ध आहे. खवय्या पुणेकरांसाठी नवीन आवडत्या पिझ्झाचा स्वाद घेण्यासाठी जेमी ओलिवरस परिपूर्ण जागा आहे. जागतिक फूड फेनोमेनन जेमी ओलिवरस यांनी २३ वर्षांपासून  लाखो लोकांना ताजे व स्वादिष्ट खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी प्रेरित केले आहेत. आपल्या संघटनेच्या माध्यमातून जेमी यांनी यूकेमधील बालकांमधील स्थूलपणा २०३० पर्यंत अर्ध्याने कमी करण्याचे आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य व सुखसमृद्ध करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य बाळगले आहे.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार जिजामातांच्या भूमिकेत!

डोलोमाईट रेस्टॉरंट्स, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेस्पर रीड म्हणाले की पुण्यात रेस्टॉरंट्स उघडताना, येथील संपन्न खाद्यसंस्कृतीचा भाग होताना आणि पुण्यातील विशेष ग्राहकांना सेवा पुरवताना आम्ही अत्यंत  उत्साही  आहोत. पुण्यातील ग्राहकांचा प्रतिसाद घेऊन त्यांना स्वागतार्ह वाटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love