आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये युवकांचा सहभाग वाढावा : डॉ.मीरा कुमार यांची अपेक्षा


पुणे : भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील .या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा लोकसभेच्या माजी अध्यक्षा डॉ. मीरा कुमार यांनी व्यक्त केली आहे 

भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या  दुसर्‍या  सत्रातील घराणेशाही- प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य ?  या विषयावर  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत्या. यावेळी माजी राज्यपाल आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील , जेष्ठ पत्रकार रशीद किडवाई, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, बीजेपीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या भारती घोष,  त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी हेंमनंदन शर्मा,कोमल बडदे,टी रेगाम,पी पटनाईक,आणि गार्गी भंडारी व्यासपीठावर उपस्थित होते .एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते.तसेच विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व मिटसॉगचे संस्थापक राहुल कराड व्यासपीठावर उपस्थित होते. 

अधिक वाचा  सिरमच्या 'कोवीशील्ड' नावाला आक्षेप: सिरमला न्यायालयाने बजावली नोटीस

या सत्रात राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सी पी जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

डॉ. मीराकुमार म्हणाल्या, भारतीय छात्र संसद हा एक चांगला आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे . या माध्यमातून यापुढील काळात अनेक चांगले लोकप्रतिनिधी तयार होतील आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्यास त्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. संसद अनेक प्रकारचे नियम कायदे करते पण त्याचबरोबर सामाजिक बदलाच्या दृष्टीने काम करण्यास  एकप्रकारे प्रेरणा मिळणार आहे. जे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे योगदान ठरणार आहे . देशाच्या लोकसभेत प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून काम करण्याची  संधी मिळाली.

शिवराज पाटील म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी  व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळणार आहे. आजच्या काळात ज्ञान व अनुभव असणारे निवडणूक रिंगणात कधी ऊतरत नाहीत. पण पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या जातात हे चित्र लोकशाहीला पूरक नाही त्याचप्रमाणे सर्वांनी समानतेच्या सूत्राचा स्वीकार करायला हवा . लोकशाही पुढे नेण्यासाठी सर्वं घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  'दगडूशेठ' गणपतीला मेरिडियन आइस्क्रीम तर्फे ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीम : तब्बल ७०० गणेशभक्तांना वाटप

डॉ. सी.पी.जोशी म्हणाले, मला युवावस्थेत विधानसभा आणि लोकसभेत काम करण्याची संधी मिळाली पक्ष कोणता आहे, यापेक्षा काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांनी देखील काम करण्याची आणि सर्व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे . राजकीय व्यवस्था बळकटीच्या दृष्टीने वंशवादा पेक्षा आपण संसदीय लोकशाहीला महत्त्व देण्याची गरज आहे. निवडणुका होतात, त्याप्रमाणे सभागृहात चर्चा .विचार होऊन धोरण नक्की करण्यात येते. त्या ठिकाणी युवकांचा सहभाग वाढला पाहिजे .

रशीद किडवाई म्हणाले, वंशवाद, परिवारवाद का?, त्यामागचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. त्यावर मनन  व चिंतन झाले पाहिजे. निवडणुकीसाठी खर्च होतो, त्याचा तपशील दिला जातो. पण हा कितपत योग्यप्रकारे खर्च होतो याचा विचार झाला पाहिजे . यासाठी खर्चाचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर गाणी व हास्यकल्लोळात पिंपळे गुरवमधील रसिक निघाले न्हाऊन

राघव चढ्ढा म्हणाले, वंशवाद आणि परिवारवाद हा नवीन नाही. राजकीय क्षेत्रात तो पाहावयास मिळतो. यामधून काही प्रश्‍न निर्माण होत आहेत. या भूमिकेला राजकारणात स्थान असणे अयोग्य आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार कारला हवा.

राहुल कराड म्हणाले, या उपक्रमातून चांगले लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असून तो अनेक वर्ष केला जातो आहे. यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात येते. त्यांच्या अनुभवाचा युवकांना नक्कीच फायदा होणार आहे.

डॉ.पौणिमा बागची आणि उन्नती दिक्षित यांनी सूत्रसंचालन केले .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love