पुणे-रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणीय संस्था कोलिअर्सच्या अहवालानुसार पुण्यातील ग्रेड ए ऑफिसच्या जागांचा वापर यंदा ५५ लाख चौरस फुटांच्यावर जाण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास ५३ टक्के वाढ झाली असून बाजारपेठेतून फ्लेक्स, सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांकडून मोठ्या प्रमाण मोठी मागणी येत आहे.
२०२२ च्या पहिल्या सहामाहीत ऑफिस भाडेत्तत्त्वावर अगोदरच ३.५ चौ. फुटांवर पोचली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत त्यात पाचपटीने वाढ झाली आहे. वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीतील मागणीने वर्ष २०१९ च्या पहिल्या सहामाहीतील मागणीला अगोदरच मागे टाकले असून त्यात १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये आतापर्यंतचा सर्वात जास्त कार्यालयीन जागेचा वापर दिसून आला होता.
जागा वापरणाऱ्यांकडून ती सोडण्याचे प्रमाण कमी होणे आणि मागणीतील वाढ, यामुळे शहरातील जागा वापरण्याचे प्रमाण सुधारत आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर, रिकाम्या जागांचे प्रमाण तिमाही ते तिमाही आधारावर ५० बेसिस पॉईंटने कमी झाले आहे. पुण्यातील सरासरी भाड्यांमध्येसुद्धा २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत १.५ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली आहे. मागणी अशीच मजबूत राहण्याची अपेक्षा असल्यामुळे भाड्यांमधील ही वाढ पुढील दोन तिमाहीतसुद्धा कायम राहण्याची अपेक्षा आहे.
कोलिअर्स पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेश त्रिपाठी म्हणाले की पुण्यात कामकाजाच्या व्यवस्थेत कार्यालयांना मुख्य स्थान राहील आणि यात अगोदरच वाढ होत आहे. येथील पायाभूत सुविधेतील प्रगती, रोजगाराच्या संधी, काम करणाऱ्या तरुणांची लक्षणीय संख्या आणि रिअल इस्टेटच्या आकर्षक किमती यामुळे भारतातील कॉर्पोरेटच्या दृष्टीने पुणे आही आश्वासक बाजारपेठ आहे आहे.
कोलिअर्स इंडियाचे संशोधन विभागाचे वरिष्ठ संचालक विमल नादर म्हणाले की “आपल्या कामकाजाच्या जागांबाबत धोरण ठरविण्यासाठी मोठ्या जागा वापरणाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. फ्लेक्स स्पेस ही जागा वापरणाऱ्यांसाठी केवळ तात्पुरती व्यवस्था नसून त्यांच्या ऑफिस पोर्टफोलियोचा तो कायमचा भाग आहे. आयटी कंपन्या, स्टार्टअप आणि उद्योजकांचे एक संपन्न स्थान म्हणून पुण्यात फ्लेक्स जागेला येत्या काही वर्षांमध्ये प्रचंड मागणी कायम राहणार आहे.”