धक्कादायक: मैत्रिणीसोबत जबरदस्तीने शरिरसंबंध : मित्राकडून चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-मैत्रिणीसोबत जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवल्यानंतर त्याचे मित्राकडून चित्रीकरण केले. यानंतर ते व्हिडीओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार कोढव्यातील आश्रफनगर परिसरात ऑगस्ट 2021 ते १४ जून २०२२ या कालावधीत घडला.

याप्रकरणी पाच जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी ३७६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २० वर्षाच्या पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणीचा मित्र, त्याची आई – बहिण व मित्राचे इतर दोन मित्र अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसऱ्या मित्राच्या मार्फत चित्रीकरण केले. काही दिवसांनी हे चित्रीकरण इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली.

हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने मित्राच्या आईची भेट घेऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी व त्यांच्या मुलीने तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच आरोपीच्या मोठ्या बहिणीने तरुणीला, ‘जास्त नाटक केलीस तर तुझे व्हिडिओ आहेत, ते आम्ही व्हायरल करु’ अशी धमकी दिली. यानंतर तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मचाले करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *