गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय- गोपालदादा तिवारी

राजकारण
Spread the love

पुणे- रिपब्लिक टीव्ही चे संपादक व टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी इंटेरिअर डेकोरेटर व आर्किटेक्चर स्वर्गीय अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपावरून अटक केली आहे, अर्णब स्वामींच्या अटकेमागे गुन्हेगारी हत्येच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना देखील गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली आहे.

यानिमित्ताने भाजपचा गुन्हेगारांना पाठीशी घालून स्वार्थी व संधीसाधू राजकारण करण्याचा खरा चेहरा उघडा पडला आहे. रिपब्लिक टीव्हीच्या खोट्या टीआरपीसाठी १५ लाख प्रतिमहिना अर्णब गोस्वामी देत असल्याचा प्रकार व त्याच्या मोबदल्यात भाजपचा राजकीय अजंटा राबवण्याचा प्रकार उघडा पडल्यामुळे रिपब्लिक सारखी चॅनेल्स व अर्णब गोस्वामी सारखे पत्रकार हाताशी धरून मुल्ये व तत्त्वांवर आधारित पत्रकारितेस मुठमाती देण्याचे भाजपचे कटकारस्थान उघडे पडत आहे असे गोपाळला तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *