देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी जेव्हा राज्यसभेत रडतात…

राजकारण
Spread the love

दिल्ली(ऑनलाइन टीम)-आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या चार सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचाही समावेश होता.आझाद यांना निरोप देताना अनेकदा देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत  भावनिक  झाले. त्यांना अक्षरक्ष: गहिवारून आले आणि सभागृहात काही काळ शांतता पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांची स्तुती करताना आणि गुलाम नबी आझादशी संबंधित घटना काय होती ते सांगून पंतप्रधान मोदी संसदेत रडले.

पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचा दाखला देत सांगितले की  गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना मीही एका राज्याचा (गुजरात) मुख्यमंत्री होतो. आमचे  खूप  जवळचे संबंध आहेत असे सांगून मोदी म्हणाले एकदा गुजरातमधील काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात आठ लोक मरण पावले. त्यावेळी मला प्रथम गुलाम नबीजींचा फोन आला आणि तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता, तर त्यांचे  अश्रू थांबत नव्हते. गुलाम नबीजी या घटनेवर सतत नजर ठेवत होते. त्यांना त्या प्रवाशांविषयी  असे वाटत होते की जणू ते त्याच्या कुटूंबाचे सदस्य आहेत. प्रणव मुखर्जी त्यावेळी संरक्षणमंत्री होते. मी त्यांना सांगितले की मृतदेह आणण्यासाठी सैन्याचे  विमान मिळाले तर बारे होईल. त्यावर त्यांनी  काळजी करू नका, मी व्यवस्था  करतो असे सांगितले आणि गुलाम नबीजी त्या रात्री विमानतळावर होते. गुलाम नबी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांचे प्रयत्न मी कधीही विसरणार नाही.”राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्याविषयी सांगताना पंतप्रधान मोदी स्वत: रडले. त्याच वेळी गुलाम नबी आझाद देखील भावनिक दिसत होते.

 पंतप्रधानांनी ज्या घटनेचा उल्लेख केला

राज्यसभेच्या संदर्भात पंतप्रधान मोदी भावूक झाले, ही दुखद घटना 30 जुलै 2007 रोजी घडली. त्यावेळी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. श्रीनगरच्या सरहद्दीवर गुजरातहून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्लेखोरांनी हल्ला केला. मुघल गार्डनकडे जात असताना बसमध्ये ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात काही लोकांचा जागीच मृत्यू झाला तर काहींचा नंतर उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच घटनेचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अपघात अतिशय वेदनादायक होता, ज्यामध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *